
Gay Gotha Anudan : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार गाई म्हैस तसेच इतर जनावरांसाठी विशेष अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत आधुनिक व मजबूत गोठे बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार अनुदान देत आहे. पशुधनांचे पालन हे चांगल्या प्रकारे व्हावे, तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना तयार केली आहे.
राज्य सरकारने शरद पवार ग्राम समृद्धी योजना 3 फेब्रुवारी 2021 रोजी घोषित केली होती. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन, पशुपालन, गाई, म्हैस इतर जनावरांचा समावेश करून आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. खास करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या योजनेअंतर्गत 453 कामी सुरू आहेत. तसेच बावीस कामांना मंजुरी मिळाली आहे. आत्तापर्यंत 107 कामे ही पूर्णपणे झालेली आहेत.
योजनेअंतर्गत गोठा बांधल्यामुळे आरोग्य हे जनावरांचे चांगले राहते तसेच चारांचा नियोजन बनते.
शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासाठी अधिक खर्च येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कोणत्याही प्रकारची कर्ज होणार नाही.
ग्राम समृद्धी योजना अंतर्गत सध्या ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयाद्वारे तुम्ही गोठ्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, तसेच कृषी अधिकारी मार्फत किंवा पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत अर्ज तुम्हाला करता येणार आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
पशुधन असल्याचे पुरावे तसेच सातबारा, आधार कार्ड, पासबुक आणि मालकी हक्काची कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारा कागदपत्रे
जर शेतकऱ्यांकडे ते सहा जनावरे असतील तर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 77 हजार 188 रुपये हे अनुदान मिळणार आहे.
सहा पेक्षा ते बारापर्यंत गाई म्हशी किंवा इतर जनावरे असतील तर तुम्हाला एक लाख 54 हजार 376 रुपये हे अनुदान मिळणार आहे.
तेरा पेक्षा अधिक जनावरे असतील तर दोन लाख 31 हजार 564 इतके अनुदान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी पात्र कोण ?
महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांकडे स्वतःची जागा पाहिजे, तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा पाहिजे. तर तुम्हाला या योजनेअंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी पात्र होण्यास आडू शकत नाही. तसेच पशुधन पाळण्याचा चांगल्या प्रकारे अनुभव असल्यास आणि ग्रामीण भागात असाल तर उत्तम आहे.
