
IMD : गेल्या़ काही दिवसात राज्यात बहूतांश भागात पाऊस पडलेला नाही. परंतू कोकण भागात पावसाचा जोर हा कमी झाला आहे. पुढील ४८ तासात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अर्लट जारी केला आहे. आज पासून राज्यात चांगल्या प्रकारे मॉन्सून हा सक्रीय होऊ शकतो. तसेच गुरुवारी राज्यात बहूतांश भागात रिमझिम पाऊस पडला आहे. परंतू आज हवामान खात्यानुसार राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे. रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात बहूतांश भागात वादळी असणार तसेच मुसळधार पाऊस सुध्द होणार आहे. यामुळे हवामान खात्याने या जिल्ह्यांना येलो अर्लट जारी केला आहे. पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण तसेच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुध्दा केली आहे.
यावर्षी मॉन्सून वेळेवर दाखल | IMD
यावर्षी राज्यात मॉन्सून वेळेवर दाखल होत असल्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये आनंदाचे वातवरण आहे. गेल्या मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता, अनेक ठिकाणी पाणीच पाणी केले होते. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस हा राज्यातून गायब झाला यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंता वाढली होती. हवामान खात्यानुसार, राज्यात आज म्हणजेच १३ जून २०२५ रोजी मॉन्सून हा सक्रीय राहिल. मुंबई आणि इतर ठिकाणी काल रात्री गुरुवारी वातावरण बदल झाल्यानंतर मुसळधार पाऊस पडलेला आहे.
आज पासून पावसाची सुरुवात
कोकण भागात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे तेथे पावसाने चांगली बॅटिंग केली आहे. येत्या काही तासात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होऊ शकतो. यामुळे हवामान खात्याने रेड अर्लट हा जारी केला आहे. तसेच महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात आज पासून पावसाची सुरुवात चांगल्या होऊ शकते. १३ जून ते १७ जून पर्यंत हवामान खात्यानुसार राज्यातील विविध भागात पाऊस होत राहिल.
आजचा हवामान अंदाज | 33 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता | Maharashtra Monsoon Update