Maharashtra Weather : पुढील दोन ते तीन दिवस राज्यात येलो आणि ऑरेंज अर्लट जारी

Maharashtra Weather : पुढील दोन ते तीन दिवस राज्यात येलो आणि ऑरेंज अर्लट जारी
Maharashtra Weather : पुढील दोन ते तीन दिवस राज्यात येलो आणि ऑरेंज अर्लट जारी

 

Maharashtra Weather : गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यात पावसाची सुरुवात झालेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कडून येणारे वारे महाराष्ट्रात वादळी स्वरूप घेऊ शकतात. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता दाट आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे, या अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ शकते. 6 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पावसाची संकट उभे राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी तसेच जनावरांची सुद्धा काळजी घ्यावी.

कोणत्या जिल्ह्यांना येलो अर्लट जारी ?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे जोरदार वाहतील तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हवामान विभागाने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. केळी, द्राक्ष, कांदा, पपई, गहू, मका तसेच इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, धाराशिव, बुलढाणा, भंडारा, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, बीड, परभणी, अकोला, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, नाशिक, रायगड, नाशिक घाट, मुंबई, ठाणे, जळगाव, पालघर या सर्व ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी ?

चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर या चार जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अर्लट दिलेला आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस तसेच जोरदार वारे आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.

News Image
महत्त्वाची बातमी

२ लाखांची कर्जमाफी आणि ५० हजारांचे अनुदान

कोकणातही तुरळक ठिकाणी सदर पाऊस होऊ शकतो. सिंधुदुर्गात सुद्धा दुसऱ्या दिवशी पावसाने हजरी लावली होती. या ठिकाणी आंबा, काजू आणि इतर पिकांनाही सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून हवमान विभागांनी या भागासाठी येलो अलर्ट पुढील दोन ते तीन दिवसाठी दिला आहे. राज्यात पावसाचे वातावरण राहील, आज सायंकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.

6 जिल्ह्यात पीक विमा वाटप

News Image
महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
लेखक / संपादक

marathi bigg boss

सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

PNFPB Install PWA using share icon

Install our app using add to home screen in browser. In phone/ipad browser, click on share icon in browser and select add to home screen in ios devices or add to dock in macos

Manage push notifications

notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications
notification icon
We would like to show you notifications for the latest news and updates.
notification icon
You are subscribed to notifications