
Namo Shetkari : राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली तसेच केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या दोन्ही योजनेमध्ये शेतकऱ्यांना तब्बल तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. या दोन्ही योजना, दरवर्षी सहा हजार रुपये म्हणजेच एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहे. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत दहा हजार रुपये देण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत 91 लाख शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे. तसेच सहावा हप्त्याची महाराष्ट्रातील शेतकरी वाट पाहत आहे. एकीकडे पीएम किसान योजनेअंतर्गत 19 वा हप्ता २४ फेब्रुवारी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील एकूण तीन हजार रुपये आठ मार्च पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित होणार आहेत.
नमो शेतकरी योजना द्वारे सहावा हप्ता कधी येणार ? | Namo Shetkari
महाराष्ट्र सरकारने कृषी विभागाद्वारे नमो शेतकरी योजना चालवत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाच हप्ते देण्यात आलेले आहेत. वाशिम मध्ये पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. त्यावेळेस अठरावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता. त्याच दरम्यान राज्य सरकारने नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले होते.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 91 लाख 45 हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत. या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत नऊ हजार कोटी देण्यात आलेले आहेत. तसेच लवकरच नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात सहावा हप्ता येणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येकी शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत 38 हजार रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी 9.75 कोटी खर्च आलेला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 8 मार्च 2025 रोजी महिलांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. परंतु नमो शेतकरी योजना अंतर्गत कोणतीही खबर किंवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकरी साहव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.