
Pik Vima : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 23 एप्रिल पासून पिक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली होती. आत्तापर्यंत १८७४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेले आहे. उर्वरित रक्कम म्हणजेच १३०७ कोटी विमा कंपन्याकडे अजून प्रलंबित आहे. शेतकऱ्यांसाठी तीन हजार 182 कोटी रुपये हे पीक विमा पोटी मंजूर करण्यात आली आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची निश्चित रक्कम ठरवणे बाकी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम जमा होण्यास विलंब होत आहे. परंतु येथे आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल.
पीक विमा ची रक्कम वाढून मिळणार | Pik Vima
दररोज जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होत आहे. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांची रक्कम निश्चित ठरवण्याचे काम सुरू आहे. म्हणजेच रोज अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पिक विमा हा जमा होत आहे. ज्यामुळे भरपाईची रक्कम सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे प्रलंबित पिक विमा हा तातडीने शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल.
मिळालेल्या माहितीनुसार २३ एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी 3182 कोटी ही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आली आहे. नैसर्गिक गोष्टीपासून शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होते. या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकार आर्थिक आधार घेत असते. राज्य सरकारने ट्रिगर अंतर्गत 713 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर केले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा वाढून मिळण्याची शक्यता राहते.
सरकारने पहिला हप्ता हा जमा केलेला आहे. तसेच लवकरच दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई साठी तिसराही हप्ता शेतकऱ्यांचे खात्यावर जमा करण्यात येईल तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट मध्ये कळवा.