
Rashtriy krishi vikas yojana : महाराष्ट्रात गेल्या पाच ते सहा वर्षात शेती हा व्यवसाय नसून तर एक संघर्षाची उमेद झाली आहे. यामध्ये सतत नैसर्गिक घटना म्हणजे अवकाळी पावसा पासून पीकांचे नुकसान तर कधी पाण्याची कमतरता अश्या घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांनवर कर्जांचे डोंगर वाढत आहे. जर महाराष्ट्र सरकारने अश्या परिस्थितीत साथ दिली तर शेतकऱ्यांना कुठे तरी आधार मिळतो.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १२० कोटी ३३ लाखाचा निधी हा वितरीत केला जाणार आहे. हा फक्त निधी नसून तर अनेक शेतकऱ्यांनसाठी जीवनदान आहे.
Rashtriy krishi vikas yojana अंतर्गत किती निधी मिळणार ?
महाराष्ट्र सरकारने २१ मार्च रोजी राज्यात नवीन शासन निर्णय काढून मोठी घोषण केली. यामध्ये वेगवेगळ्या गटातील शेतकऱ्यांना निधी हा वाटप केला जाणार आहे.
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना ९८ कोटी २१ लाख रुपये मंजूर केले आहे. तसेच अनुसूचित जाती साठी राज्य सरकारने १४ कोटी ७१ लाख रुपये मंजूर केले आणि अनुसूचित जमाती साठी ७ कोटी ३९ रुपये वाटण्यात येणार आहे.
Rashtriy krishi vikas yojana योजना म्हणजे काय?
राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) अंतर्गत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार सहकार्यातून निधी देते. यामध्ये २०२४ ते २०२५ मध्ये २९३ कोटी २९ लाख रुपये इतका या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. आता पर्यंत ७४ कोटी ७४ लाख केंद्र सरकार तसेच ४८ कोटी १३ लाख महाराष्ट्र सरकारने निधी मंजूर केला आहे.
Rashtriy krishi vikas yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काय मिळणार ?
यामध्ये शेतकऱ्यांना मृदा आरोग्य, सूक्ष्म सिंचन, कृषी स्टार्टअप, सेंद्रिय शेती अशा प्रकारे शेतकऱ्यांना आधार मिळू शकतो.