
Subsidy On Tractors : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनुदानावर मिनी ट्रॅक्टर हे वाटप केले जाते. यामध्ये सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जाती तसेच नवनौध्दांच्या स्वयंसहाय्यता या बचत गटाच्या अंतर्गत तुम्हाला मिनी ट्रॅक्टर मिळवण्यासाठी अनुदान दिले जात आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना २० टक्के अनुदान दिले जाणार आहे.
ट्रॅक्टर वर अनुदान मिळवण्यासाठी प्रक्रिया | Subsidy On Tractors
गेल्या सुध्दा सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जाती तसेच नवनौध्दांच्या स्वयंसहाय्यता या दोन्ही बचत गटांना सरकारकडून मिनी ट्रॅक्टर साठी अनुदान मंजूर करण्यात आले होते.
- बचत गटांचे सदस्य असल्याचे प्रमाणपत्र.
- राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असावे तसेच बँकेकडून प्रमाणित असलेली यादी पाहिजे.
- तसेच इतर सदस्याचे जातीचे दाखले पाहिजे.
- राहिवाशी दाखला
- आधारकार्ड आणि रेशनकार्ड जोडणे अनिवार्य आहे.
- मिनी ट्रॅक्टर वरती अनुदान मिळवण्यासाठी सर्व सदस्यांची मंजूरी व एकत्रित छायाचित्र पाहिजे.
मिनी ट्रॅक्टर किती अनुदान मिळते ?
सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जाती साठी ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून ३ लाख १५ हजार रुपये अनुदान हे वितरीत केले जाते. त्यासाठी बचत गटात किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती पाहिजे किंवा नवबौध्द असले तरीही मंजूरी मिळते.
