
Weather Update : एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा हा जास्त वाढत असतो. परंतु यावर्षी एप्रिल महिन्यात चांगल्या प्रकारे पावसाची संकट उभे राहिले आहे. मात्र दुसरीकडे उष्णतेचा पारा ही वाढत आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची संकट उभे राहणार आहे.
गेल्या 48 तासात राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पुढील येणाऱ्या 24 तासात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. खास करून विदर्भ, मराठवाड्यात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या
माहितीनुसार, राज्यात अवकाळी पाऊस हा जोरदार वाऱ्यासह होणार आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची संकटे वाढतील.
पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभाग या चार विभागांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे. सध्या मध्य प्रदेशांमध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच कर्नाटकापर्यंत हा कमी दाबाचा पट्टा आपणास पाहायला मिळेल परंतु महाराष्ट्रात याच गोष्टीचा परिणाम वाढू शकतो.
बीड, नासिक, नांदेड, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, पिंपरी चिंचवड, पुणे या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडू शकतो. द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.