
Weather Update Today : गेल्या दोन-तीन दिवसापासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दिवसा कडक उन्हाचा पारा वाढतो तर रात्री अचानक ढगाळ वातावरण तयार होते. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना तडाका सुद्धा बसलेला आहे. दिवसा कडक व रात्री ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
10 जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी | Weather Update Today
जळगाव, संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, चंद्रपूर, सातारा, अमरावती, बीड आणि नाशिक यासारख्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून जालना जिल्ह्यात हवामानत बदल झालेला आहे. वरील जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट होऊ शकते तसेच पुढील काही दिवसात उष्णतेचा धोका हा पिकांना वाढू शकतो, यामुळे शेतकऱ्यांनी आपली व पिकांची तसेच जनावरांची काळजी घ्यावी. मुंबई शहरात आज सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. लातूरमध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावली होती तसेच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल झालेले पाहायला मिळाले आहे.