Maharashtra Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. गेल्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भातील अनेक भागात जोरदार वारे आणि ढगाळ वातावरण तयार झालेले पाहयला मिळाले आहे. पुणे आणि मुंबईत गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल होत आहे परंतू IMD ने दिलेल्या अंदाज नुसार येत्या काही दिवसात मुंबईत आणि पुण्यात पाऊस होऊ शकतो.

महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार आहे ? (Rain Forecast in Maharashtra)
भारतीय हवामान विभागाने IMD दिलेल्या हवामान अंदाजनुसार आपण सविस्तर माहिती खाली देत आहे.
- पुणे शहरात प्री मॉन्सूने दमदार हजेरी लावली आहे. महत्वाचे म्हणजे पुणे शहरात पाऊस पडल्याने वातावरणातील तापमान कमी झालेले दिसले आहे. तसेच यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
- मुंबई मध्ये दरवर्षी प्रमाणे तेथे तापमान अधिक असते आणि याहि वर्षी ते पाहयला मिळाले आहे. आता मुंबई मध्ये गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण पाहयला मिळाले आहे. हवामान खात्यानुसार येत्या दोन दिवसात हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
- दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात सर्वात आधी मुसळधार पाऊस पाहयला मिळतो. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दोन जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर वारे आणि मुसळधार पाऊस पडू शकतो.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा ? (Vidarbha Heatwave Alert)
- भारतीय हवामान खात्यानुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात अजूनहि पावसाचे वातावरण तयार झालेले नाही, त्यामुळे ठिकाणी उष्णतेचे प्रमाण आहे.
- नागपूर, चंद्रपूर आणि अकोला या तीन जिल्ह्यात २४ मे २०२५ रोजी ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या इतके पाहयला मिळाले आहे.
- विदर्भात आणखीन उष्णता पाहयला मिळू शकते यामुळे हवामान खात्याने पुढील दोन दिवसासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. महत्वाचे म्हणजे उष्णतेचे प्रमाण हे कमी होणार नसल्यामुळे नागरिकांनी आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी.
२०२६ मध्ये भारतासाठी मान्सूनचा अंदाज काय आहे? (Monsoon Update India)
मान्सून अपडेट नुसार देशभरात एकूण ३० राज्य आहेत यापैकी अनेक ठिकाणी पुढील सहा दिवसात पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
- नैऋत्य मोसमी वारे हे अरबी समुद्राच्या मार्गाने बंगालच्या उपसागरात आले आहेत. हवामान खात्यानुसार हेच वारे तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या तीन पर्यंत वेगाने येऊ शकतात, यामुळे या तीन राज्यात मॉन्सून पाऊस जोरदार होऊ शकतो.
- यामुळे ईशान्य भागातील आसाम आणि मेघालय मध्ये सुध्दा जोरदार पाऊस होणार आहे.
- उत्तर भारतात दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश या चार राज्यात हवामान खात्यानुसार येथे उष्णता राहणार आहे. तसेच दिल्ली आणि राजस्थान मध्ये उष्णतेचे प्रमाण अधिक राहिल पुढील काही दिवस तापमानात घट होणार नाही.
निर्कष : भारतीय हवामान विभाग (IMD) मते मान्सूनचे वारे बंगालच्या उपसागरात पोहचले आहेत. येत्या काही दिवसात भारतात प्रवेश करतील त्यामुळे लवकरात लवकर शेतीची मशागत पुर्ण करुन घ्यावी व पेरणीची घाई करु नये. मंगळवार आणि बुधवार पर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

