राज्यात दोन प्रकारचे हवामान पाहयला (Maharashtra Weather) मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे काही भागात पावसाचा अंदाज तर काही भागात उष्णतेची लाट आहे. अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी उष्णतेची लाट आहे, तर पुणे, सातार इतर जिल्हे मिळून १२ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिच आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महत्त्वाचे मुद्दे:
राज्यातील हवामान (Maharashtra Weather): एकाच वेळी दोन वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव; काही भागात कडक ऊन तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण.
विदर्भ हवामान (Vidarbha Weather): अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या ४ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’.
पावसाचा इशारा (Rain Alert): पुणे, साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १२ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता.
मुंबई हवामान (Mumbai Weather): मुंबई, ठाण्यात उकाडा वाढणार; तर रायगड, रत्नागिरीत हलक्या पावसाचा अंदाज.
हवामान खात्याचा नवीन अंदाज: राज्यात दुहेरी वातावरणाचा अनुभव
सध्या राज्याच्या हवामानात (Maharashtra Weather Today) सातत्याने बदल पाहायला मिळाले आहे. आपल्याला एकाच वेळी दोन वेगळे प्रकारे ऋतू अनुभवात आले आहेत. एकीकडे विदर्भात कडक ऊन पडत आहे, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे ढग दाटून आले होते. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढचे दोन ते तीन दिवस हे वातावरण अश्याच प्रकारचे दिसेल. याच संदर्भात, सविस्तर माहिती जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात हवामान कसं असेल.
विदर्भ हवामान अंदाज: अमरावती, चंद्रपूरसह ४ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
विदर्भात उष्णतेची लाट हि वाढत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येथील वातावरणात पुढील काही दिवस खूप उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी विशेष काळजी घेणं गरजेचे आहे.
रेड अलर्ट (उष्णतेची लाट): अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा.
ऑरेंज अलर्ट: नागपूर आणि अकोला.
यलो अलर्ट: भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ.
मुंबई हवामान आणि कोकणातील पावसाचा अंदाज
मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना उकडा अधिक असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. हवेत दमटपणा जास्त असल्याने तापमान कमी आहे परंतू उकाडा अधिक जाणवतोय. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
पण कोकणात थोडं वेगळं चित्र आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. तिथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचा इशारा: १२ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
उन्हाळ्याची चाहूल लागलेली असली तरी, राज्यातील १२ जिल्ह्यांना वादळी पावसाचा (Unseasonal Rain in Maharashtra) इशारा दिला आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग येतो.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर. इथे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा: बीड, लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात.
शेतीची काळजी आणि नागरिकांना आवाहन
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. येणाऱ्या काही अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी फळबाग आणि शेतीचे नुकसान टाळावे यासाठी उपाय करावे.
विदर्भात उष्णतेची लाट अधिक राहिल त्यामुळे शेतकऱ्यांनी दुपारी काम करायचे टाळावे व आपली काळजी अधिक घ्यावी. महत्वाचे म्हणजे ज्या भागात पावसाचे प्रमाण अधिक असेल तेथे आपल्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठी सुरक्षित ठिकाणी आपला माल ठेवावा.
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

